कापूस कडबी बाजार हा उपबाजार असून सदर बाजार हा बुटीबोरी येथे आहे.या ठिकाणी कापसाची खरेदी विक्री होत असते.
सदर बाजार आठवड्यात ३ दिवस असतो. बाजारात मोठ्या प्रमाणात बकरे विक्री साठी येतात.
भाजी बाजारा मध्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक येत असते. सदर बाजार सकाळी ४ ते दुपारी १ वाजे पर्यंत दररोज सुरु राहतो.
समितीचे न्यू-ग्रेन उपबाजारा मध्ये बाहेर राज्यातून गहू,तांदूळ,मका ची मोठ्या प्रमाणावर आवक येत असते.
समितीचे कांदा-बटाटा उपबाजारा मध्ये राज्यातून कांदा-बटाटा ची मोठ्या प्रमाणावर आवक येत असते.
सदर बाजार हा आठवड्यात एकच दिवस गुरुवारला भरत असतो.गाई,म्हशी व बैलांची आवक या दिवशी मोठ्या प्रमाणावर होते.
समितीचे मिरची उपबाजारा मध्ये बाहेर राज्यातून (आंध्र,तेलंगाना) लाल मिरची ची मोठ्या प्रमाणावर आवक येत असते.
समितीचे संत्रा व फळे बाजार उपबाजारा मध्ये बाहेर राज्यातून (आंध्र,तेलंगाना,हिमाचल प्रदेश,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश) मोसंबी,अननस,आंबे,सफरचंद व चिक्कू या फळांची मोठ्या प्रमाणावर आवक येत असते.
